poem on Dr.Babasaheb Ambedkar and Mata Ramabai Ambedkar
कविता- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर १) सलाम माझा या महामानवाला ॥ शुन्यातून केली सुरुवात, अमर झाले इतिहासात आंबेडकर असे त्यांचे नाव आपल्या सर्वांचे असे भीमराव ॥१॥ शुद्रापोटी जन्म घेतला, प्रत्येक वर्णाचा विकास करविला, बघता बघता या मानवाचा महामानव झाला... ॥२॥ आयुष्य गेले लढण्यात, प्रत्येकाचा विचार करण्यात, या देशाला समतेकडे नेण्यात, प्रत्येकाला भारतीय म्हणून घडवण्यात ।।३।। बालपण जोडीले पुस्तकांना, लोडीले अनेक बंधनांना, न्याय मिळवून दिला बहुजनांना, निर्माण केले संविधान, घडले कारण लोकशाहीला ॥४॥ सलाम माझा या महामानवाला ॥ कविता- माता रमाबाई आंबेडकरांवर १) त्यागमुर्ती रमाई ! बुद्ध विचारांच्या सोबतीला..! घोट विचारांचा प्याली..!! स्वप्न जगण्या भिमरावांचे..! रमा त्यागमुर्ती झाली..!!१!! दारिद्र्याच्या झोतामंधी..! ति गरिबीतं नाहली..!! बाबासाहेब विचारात ती..! अंगी अलंकार पाहली..!!२!! तिने कधी न केली भिमरावांना..! चैन सुखाची मागनी..!! ...